✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏
Sunday, 18 October 2026
तुळजाभवानी मातेच्या पंलगांचे खर्डा शहरात आगमन व भव्य स्वागत....
सालाबादप्रमाणे यंदाही तुळजाभवानी मातेच्या पंलगांचे खर्डा शहरात दुपारी पांच वाजता आगमण झाले आराधी भांवीकांची स्वागतासाठी सज्ज विविध धार्मिक आराधी गाण्यांनी खर्डेकर मंत्रमुग्ध झाले मध्येच आईराधा उदे उदे च्या आवाज ने परिसरात भक्ती मय वातावरणात देवीच्या भक्तांनी हळदकुंकू च्या सौभाग्यवती चे मळवट भरून हळदकुंकांची उधळण केली खरच जनतेच्या भावना उजळून निघाल्या आघात महीमा या दैवी शक्ती चां प्रत्येक जगदंबा मंडळाच्या वतीने आयोजित आरती कार्यक्रम आयोजित केले होते आठ ते दहा ठीकाणी मंडळे स्थापन करण्यात आली असून प्रत्येक मंडळाच्या या जगाच्या आईचे भव्य दिव्य स्वागत फटाक्यांची आतषबाजी व हळद कुंकाची उधळून तल्लीन होऊन मनमुराद पुणे दांडीया खेळत होते खडकपुरा नवरात्र उत्सव समितीचे मा सूळ बंधु यांच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आई भवानी मातेच्या पंलगांचे दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेले होते ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे मा.सतोषशेठ सूळ गणेश भाऊ सुळ ,राहूल सुळ यांच्या माध्यमातून येथे भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले व आरती संपूर्ण मा सूळ परिवाराच्या हस्ते करण्यात आली व यांनी आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडी व बेसन भाकरी जेवण व्यवस्था केली होती खर्डा पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत साहेब,पि एस आय अशोक खेडकर, हवालदार संभाजी शेंडे, सर्वांना परिचित काॅ.शशिकांत म्हस्के,एल सि बी चे मनोज साखरे व पोलीस कर्मचारी महीला काॅ.मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अतिशय चोखपणे बंदोबस्त ठेवल्याने खर्डा येथील सर्व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी खर्डा पोलिसांचे आभार मानले पुढील प्रवासासाठी तुळजाभवानी मातेच्या पंलगांचे प्रस्थान
पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत साहेब यांच्या धडाकेबाज कारवाई.....
अवैध धंदे, अवैध्य वाहतूक,खिसेकापू, घरफोडी आरोपी सर्वांचे धाबे दणाणून सोडणारे मा उज्वलसिंह राजपूत साहेबांच्या धडाकेबाज कारवाई चे परीणाम
खर्डा व खर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांना सुरक्षितता निर्माण करण्यासाठी अहोरात्र दिवसा, रात्री अचानक पोलिस कर्मचारी सह भेट देऊन गुन्हेगारावर वचक निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्नशील असल्याने खर्डा व व पोलीस स्टेशन हद्दीतील महीला पुरुष अबालवृद्ध बिनधास्त पणे कशाचीही भिति न बाळगता दैनंदिन कामासाठी फिरत आहेत सातत्याने दारू वर धाड,बस स्थानक परिसरात सातत्याने पोलिस कर्मचारी गस्त, शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनवर विषेश लक्ष ,रात्री सायराण वाजवत पोलिस गस्त सार्वजनिक मिरवणुकीत सातत्याने प्रत्येक्क्षपणे जातीने बंदोबस्तात हजर या मुळे याच मुळे खरे कायदा सुव्यवस्था खर्डा भागातील अभादीत आहे या साठी खर्डा पोलिस स्टेशन चे सर्व पोलिस कर्मचारी सह यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते
Thursday, 15 October 2026
अभिष्टचिंतन सोहळा खर्डा येथील प्रसिद्ध पान मर्चंट व गोळ्या बिस्कीट चे होलसेल व्यापारी....
मा सद्दामभाई तांबोळी यांची या व्यवसायातील तिसरी पिढी आहे.यांच्या अभिष्टचिंतन सोहळा खर्डा शहरातील तांबोळी चौक या चांदनी चौक या ठिकाणी अतिशय दिमाखदार सोहळ्यात पार पडला हा सर्व कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केला होता भर चौकात केक कापून व फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली या वेळी मा सद्दामभाई तांबोळी म्हणाले दुष्काळ जन्य परिस्थितीमुळे माझा अभिष्टचिंतन सोहळा हा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने साजरा करणे आवश्यक होते परंतु मित्रांचे अतुट प्रेमा पोटी केलेले माझे मन सोक्त कौतुक आपण केले सर्वांचा मी ऋणी आहे माझे आईवडील व माझे सर्व सखेचुलत भाऊ ,चूर्णे चुलती, बहीणी आम्ही एका कुटुंबातील असल्या प्रमाणे सर्वांशी आपुलकी प्रेमा राहतोत.शेवटी प्रेम , आपुलकी,माया,एकसंघटीत पणा ही सुखी कुटुंबाची नांदी आहे
जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळ 41 वर्षाची परंपरा कायम..
खर्डा वार्ताहर
ऐतिहासिक खर्डा शहरात मराठी मुलांच्या शाळेजवळ सुमारे 41 वर्षापूर्वी येथील गोरगरीब वंचित शोषित घटकातील व सायकलवर उदरनिर्वाह करण्यासाठी भंगार गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवरात्र उत्सवात देवी बसवण्याचा मानस केला होता. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वतःचा हिस्सा व लोकवर्गणीतून मोठ्या थाटामाटात जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळ स्थापन करून देवीची घटस्थापना केली होती. त्यावेळी ची संकल्पना युवराज आडागळे, जयवंत गायकवाड, भारत शिंदे, नागनाथ आडागळे, दशरथ पौडमल, विलास जाधव, निजाम मुजावर, शंकर आरुणे , प्रकाश शिंदे, राजू डाडर,योगेश अडागळे, संजू मोरे, संजय डाडर,आवि शिंदे,शंकर शिंदे,सचिन जाधव,सचिन शिंदे , संपत डाडर इत्यादी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यांच्या साथीला मदतीचा व सहकार्याचा हात देण्यासाठी दरवर्षी इतर कार्यकर्तेही होतेच. तो उत्साह कायम होता. दिवसेंदिवस बदल होत गेला. काही पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेले नवे चेहरे समोर आले नव्या दमाच्या चेहऱ्याने ती परंपरा आजही कायम जपलेली आहे.पुढील काळात ग्राम पंचायत सदस्य राजू मोरे, राम शिंदे, विलास जाधव ,विजू मोरे,शंकर आरुणे यांनी मंडळाला विशेष सहकार्य केले. मात्र पूर्वीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन व सहभाग आजही जय अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणवतो.मंडळाच्या वतीने आराधी गाणे,दररोज देवीची आरती,लहान मुलांचा संगीत खुर्चीचा खेळ,गरबा नृत्य,याने वातावरण आनंदी व उत्साही होते.सातव्या माळेला पलंगाचे आगमन होते.त्या दिवशी पलंगाचे स्वागत केले जाते.समाजातील महिला,पुरुष व अबाल वृद्धांना दर्शनासाठी चांगली सोय करून देण्यात येते यावेळी फराळाचे वाटप खिचडी केळी चहापान याची सुंदर व्यवस्था केली जाते आजही अंगावर काटा आणणारा प्रसंग सातव्या माळेचे दिवशी प्रत्येकाला अनुभवास मिळतो. आज 2026 मध्ये जय अंबिका तरुण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष निखिल आडागळे ,विशाल अरुणे, ऋषी शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते गणेश (भाऊ ) जाधव , दादा मोरे, किरण जाधव,राहुल ढाले,किरण गायकवाड,अंकुश डाडर,कृष्णा दाखले, कुणाल मोरे, कमलेश मोरे सुशील दाखले ,दत्ता मोरे, पप्पू मोरे, समाधान जाधव, शंकर गायकवाड , कृष्ण आल्हाट, अजय जाधव,सचिन जाधव,प्रधान जाधव, धनु डाडर,लखन जाधव,कांतिलाल जाधव,विनोद डाडर,संतोष डाडर, रोहित डाडर , शिवा मोरे, अमोल अडागळे,मनोज शिंदे,अखिलेश शिंदे, संभाजी मोरे, गणेश मोरे, कृष्णा थोरात,कपिल जाधव,आतिश जाधव, निलेश मोरे,जीवन डाडर ,अक्षय शिंदे, बबलु डाडर, गणेश शिंदे,संतोष शिंदे, सनी डाडर,नागेश मोरे, सुमित मोरे,आदि कार्यकर्ते मंडळाच्या सामाजिक कामात हातभार लावतात. व उत्साही वातावरणात आई तुळजा भवानी मातेची ज्योत घेऊन येतात.मोठ्या भक्ती भावाने यावेळी देवीचे दर्शन घेतले जाते.
Monday, 12 October 2026
महेबुब सुबानी संदल व उरुसखर्डा शहरातील बंगला गल्लीतील हिंदू व मुस्लिम धर्मातील दोन्ही भक्ततांचे ऐक्याचे स्थान....
आदरणीय व भावनिक दोन्ही समाजाचे नवसपृर्ती स्थान म्हणजे महेबुब सुबानी देवस्थान चां आज उरुस व भव्य सुदंल (छबीना) मिरवणूक काढण्यात आली होती खर्डा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मा मदन पाटील व अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष मा शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा संदल व उरुस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध धार्मिक विधी या दर्ग्यात पार पडली या दर्ग्याचे जिनोध्दराचे काम अतिशय सुबक व सुंदर करण्यात आले असून कै नितिन गोलेकर वि वि का सेवा संस्थेचे माजी संचालक मा शेख फारूख मोतीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बांधकाम झाले असून भावी कानी लोक वर्गाणी च्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले आहे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक भावी कानी नवसपृर्ती च्या माध्यमातून या ठिकाणी मनातून व्यक्त केलेल्या भावनेतून नारळ तोरण,हीरवा गल्फ,फूलांची चादर ,गोड भात,गुळाची शेरणी अशा प्रकारे महेबुब सुबानी चरणी अर्पण केले मुस्लिम धर्मा प्रमाणे प्रार्थना करुन कार्यक्रमाची सांगता केली ए गौस तरूण मंडळ व जय भवानी तरूण मंडळ यांनी जिनोध्दारासाठी शारीरिक श्रम दान करून दर्गा बांधकाम पूर्णत्वास नेले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांनी विशेष परिश्रम घेतले
Wednesday, 7 October 2026
खर्डा येथील शनि मारूती मंदिरा च्या पाठी मागे सार्वजनिक गणपती विसर्जन करतात...
या विहीरीला भरपूर पाणी असून दुष्काळ जन्य परिस्थितीला जनावरांना पिण्यासाठी पाणी टंचाई परिस्थिती यांचा खूप मोठा आधार निर्माण होईल पाणी टंचाई निर्मुलन निधी तून किंवा खर्डा ग्रामपंचायत प्रशासकाच्या माध्यमातून या विहीरीतील गाळ व वेस्टज पडलेली घाण जर क्रेन च्या माध्यमातून उपसून काढली तर या पाण्याचा जनावरांना या सांड पाणी वापरासाठी भरपूर फायदा होईल खर्डा येथील कस्तुरबाई मठातील श्रीराम भक्त व गोरक्षनाथ भक्त यांनी अंग मेहनतीने बर्या पैकीं या विहीरीची स्वच्छता केली आहे परंतु भरपूर गाळ असल्याने क्रेन द्वारे उपसा केला तर थोड्याफार प्रमाणात काही गल्लीतील लोकांना जवळ चे जवळ पाणी उपलब्ध होईल या साठी खर्डा ग्रामपंचायत प्रशासक अधिकार्यानी प्रत्येक्श पाहणी करुन पाणी टंचाई परिस्थिती हे महत्त्वाचे काम हाती घ्यावे अशी मागणी कस्तुरबाई मठातील भक्त मंडळी ने केली आहे
Monday, 5 October 2026
खर्डेकरांच श्रीराम मंदिर बांधकाम साठी उस्फुर्त प्रतिसाद....
खर्डा शहरात साकारते श्रीराम मंदिर याच बांधकाम करण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यासाठी खर्डेकर सरसावले आहेत श्रीराम मंदिर बांधकाम चे श्रीराम भक्त ज्या गल्लीत जातात त्या ठिकाणी अबालवृद्ध व महीला लोकवर्गणी स्व इच्छने देतात व श्रीराम भक्त ते आनंदाने स्वीकारतात कोणाला ही बळजबरी नाही दिले ठीक नाही म्हणाले त्यांचे पण आभार प्रत्येक कुटुंबाला आर्थिक अडचण असते ते समजून श्रीराम भक्त जाणून घेतात कोणी नाही म्हटले तरी त्याची कोठे चर्चा नाही सर्व आपलेच आहेत गाव आपले आपण गावाचे लोकवर्गणी तुन दिलेली मदतीचा एक एक दगड तुम्ही दिलेल्या सहकार्य चां आहे राजस्थान वरून जो दगड मागवला आहे त्यावर राजस्थान कारागिर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन करतात त्यांचे पण हातावरचे पोट आहे त्यांच्या कामाचे पैसे लगेच द्यावी लागतात मंदिर बांधकाम इतके चांगले होणार आहे की या ऐतिहासिक खर्डा नगरीत हाजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतील चांगले काम करण्यासाठी वेळ आणि पैसा लागतो हे सर्व करताना सहनशीलता ही ठेवावी लागते तो गुण श्रीराम जी कडून प्राप्त झाले आहे कस्तुरबाई मठात आजही पूर्वी प्रमाणेच धार्मिक विधी चालू असून भावी कांची सातत्याने येणे जाणे चालू आहे अम्रनाथ महाराजांच्या आशिर्वादाने अनेक भावीक समाधानी झाले आहेत सेवा, श्रध्दा व धार्मिकत्ता महत्वाची आहे
Subscribe to:
Posts (Atom)