✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Monday, 12 October 2026

महेबुब सुबानी संदल व उरुसखर्डा शहरातील बंगला गल्लीतील हिंदू व मुस्लिम धर्मातील दोन्ही भक्ततांचे ऐक्याचे स्थान....

आदरणीय व भावनिक दोन्ही समाजाचे नवसपृर्ती स्थान म्हणजे महेबुब सुबानी देवस्थान चां आज उरुस व भव्य सुदंल (छबीना) मिरवणूक काढण्यात आली होती खर्डा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मा मदन पाटील व अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष मा शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा संदल व उरुस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विविध धार्मिक विधी या दर्ग्यात पार पडली या दर्ग्याचे जिनोध्दराचे काम अतिशय सुबक व सुंदर करण्यात आले असून कै नितिन गोलेकर वि वि का सेवा संस्थेचे माजी संचालक मा शेख फारूख मोतीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बांधकाम झाले असून भावी कानी लोक वर्गाणी च्या माध्यमातून हे काम पूर्ण झाले आहे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती अनेक भावी कानी नवसपृर्ती च्या माध्यमातून या ठिकाणी मनातून व्यक्त केलेल्या भावनेतून नारळ तोरण,हीरवा गल्फ,फूलांची चादर ,गोड भात,गुळाची शेरणी अशा प्रकारे महेबुब सुबानी चरणी अर्पण केले मुस्लिम धर्मा प्रमाणे प्रार्थना करुन कार्यक्रमाची सांगता केली ए गौस तरूण मंडळ व जय भवानी तरूण मंडळ यांनी जिनोध्दारासाठी शारीरिक श्रम दान करून दर्गा बांधकाम पूर्णत्वास नेले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांनी विशेष परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment