भक्ती रसाची अनुभुती देणारा टाळ मृदंगांचा गजर हवेत फडफडणार्या भगव्या पताका डोक्यावर तुळशी वृंदावन गळा तुळशी माळा मुखी भानुदास एकनाथ महाराजांचे अखंड स्मरण पुढे मानाचा अश्व आणि अनेक भाविकांनी दिलेला पालखीला खांदा संपूर्ण फुलांनी सजवलेल्या पालखीतील पादूका दर्शनाची लागलेली आस हे दृष्टिपथात येताच कृतार्थ भावनेने मनोभावे जोडले हात अशा भक्तिमय वातावरणात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे ऐतिहासिक खर्डा नगरीत आगमन झाले संत एकनाथ महाराज पालखीचे हभप रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी व योगेश बुवा रघुनाथबुवा गोसावी ( पालखीवाले )सोहळा प्रमुख असून यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली पंचवीस ते तीस हाजार वैष्णवांचा मेळा त्यांच्या समवेत आहे आज खर्डा येथील मेन रोडवर असणार्या श्रीराम हवेलीत मुक्कामाला आहे . खर्डा ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांची जेवणाची झोपण्याची व्यवस्था केली जाते शासना कडूनही व्यावस्था केली चांगल्या प्रकारे सहकार्य केले जाते पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे तर संत एकनाथ महाराजांच्या पालखी बरोबर पाणीटॅंकर, वैद्यकीय अधिकारी पथक , सर्व प्रकारचे औषध असणारे वाहन आहे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळाल्या आहेत यांचे प्रतिनिधी सुध्दा प्रत्येक्षात सहभागी झाले आहेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा पालखी सोहळा नेहमीच्या मार्गाने प्रस्थान करत आहे प्रत्येक ठिकाणी श्री महाराजांच्या पादुकांना दैनंदिन अभिषेक पुजा , नैवेद्य या साठी पुजारी श्री वे.शा.स.प्रसाद उत्तमराव सेवनकर ,श्री वे.शा.स. रविंद्र मधुकरराव साळजोशी, श्री चंद्रशेखर रामचंद्र उपाध्ये, श्री रविंद्र कुलकर्णी सेलुकर,व धनंजय बिनीवाले यांच्या हस्ते दोन्ही वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने दैनंदिन पुजा, अभिषेक केला जातो आहे.या सर्व वातावरण भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याने संत येती गावा तोची दिवाळी दसरा
No comments:
Post a Comment