✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Thursday, 16 July 2026

संत ज्ञानेश्वर महाराज जन्म भूमी आपेगाव आज ऐतिहासिक खर्डा नगरीत आगमन....

संत ज्ञानेश्वरांची जन्म भूमी आपेगाव येथून भक्ती पंरपरा व संस्कृतीचा अनोखा संगम या पवित्र पावन आषाढी वारीच्या निमित्ताने आपणांस अनुभवायला मिळत आहे 
संत ज्ञानेश्वरांच्या माता रूक्मिणी आई पिता विठ्ठलपंत सह भव्य दिव्य दिंडी पालखी रथ सोहळ्याचे अगमण शिवलिंगाची पंढरी असणार्या व इतिहास कालीन वारसा लाभलेल्या शिवपट्टण उर्फ खर्डा नगरी मध्ये होत आहे ज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा भक्त त्रिंबकपंता
नी या सोहळ्यास सुरुवात केली या वारीला ९०० वर्षांची परंपरा आहे आषाढी वारीचा सोहळा हा वारकरी पंरपरा व नव्या तरूण पिढीला संत वैष्णवांच्या विचाराने जोडणारा एक अलौकिक अद्वितीय अवर्णनीय असा लोक उत्सव आहे हरिनामाचा गजर संत विचारांचा प्रसार आणि समाजात सदभावेनेचा संदेश पाठवणे हाच या सोहळ्याचा उद्देश आहे ही दिंडी म्हणजे संत विचारांनी समाजाला जोडणारी भक्तीची अंखड पंरपरा आहे असे परखड मत आपेगाव ज्ञानेश्वर मंदिर संस्थाचे अध्यक्ष श्री हभप अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर (दादा) यांनी व्यक्त केले हा दिंडी सोहळा दिनांक १७-७-२०२६ शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता ऐतिहासिक खर्डा नगरीत आगमन होत असून खर्डा माऊली भक्तगण व मयूरेश्वर तरूण मंडाळाचे कार्यकर्ते या पालखीचे स्वागत करतील पालखी दिंडी सोहळ्याचे प्रमुख श्री हभप भानुदास ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर भाऊ हे आहेत

No comments:

Post a Comment