या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक व दैनिक लोकमत चे पत्रकार मा संतोष थोरात यांनी मा रविंद्र कुलकर्णी यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला तसेच परशुराम संघटना अध्यक्ष व मा ग्रामपंचायत सदस्य श्री महेश दिंडोरे यांनी समाजाच्या माध्यमातून त्यांचा सपत्नीक व आईसाहेब ग.भ.सुशिलाकाकू कुलकर्णी यांचा ही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तर भूसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा कांतिलाल खिंवसरा यांनी त्यांचा येथेच्छ सन्मान केला
या वेळी दैनिक लोकमत चे पत्रकार संतोष थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले मा रवि काका कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे कोणत्या हि कामात परफेक्ट असणारे व आर्थिक व्यवहार विश्वासु असणारे रवि काका कोणतेही कार्य असू द्या लग्न समारंभ असो, सार्वजनिक धार्मिक कार्य असो, आर्ट ऑफ लिव्हिंग चे कार्य असो,या दुःखदायक घटना असो सातत्य ने पाहिजे तशा प्रकारची मदतीची भावना त्यांच्या स्वभावात आहे वतेंचे ते स्वभावाचे वैशिष्ट्य आहे व त्यानी केलेल्या मदतीची कोठेही ते वाच्यत करत नाही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जोपासले हे व्यक्तीमत्व आहे
या वेळी सत्काराला उत्तर देताना मा रविंद्र शंकरराव कुलकर्णी म्हणाले तुम्ही माझ्या वर केलेल्या अतुट प्रेमाणे मी भारावून गेलो आहे आता तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्याचा उल्लेख हा फक्त आणि फक्त कै सदगुरू श्री दत्त महाराज यांच्या कृपेने व मा गुरुवर्य श्री ताईमहारांजा चे आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी समाजकार्याचा वारसा घेऊन चालो आहे याला माझे वडील कै शंकरराव कुलकर्णी व श्रीमती सुशीला कुलकर्णी यांच्या आशिर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व परशुराम संघटना यांच्या सहाय्याने मी हे कार्य करतो आहे त्यांना माझ्या कार्याचे श्रेय त्यांना अर्पित करतो
या कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार साधक व परशुराम संघटना, व्यापारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परशुराम संघटना अध्यक्ष महेश दिंडोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली
No comments:
Post a Comment