यावेळी अकरा ब्राह्मणांनी मंत्रोच्चार व जयघोषाच्या गजरात रुद्रपठण केले. रुद्रपठणाच्या पवित्र मंत्रोच्चाराने संपूर्ण देवस्थान परिसर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला. हा सर्व धार्मिक विधी शोभना जनरल स्टोअर्स चे व्यावस्थापक मा बाळासाहेब रणभोर व मा महेशजी रणभोर यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा भक्तिभावाने लाभ घेतला.
कार्यक्रमात प्रवचनकार नामदेव महाराज सानप (पाटोदा) तसेच अमृतलिंग देवस्थानचे महंत यांनी उपस्थित भाविकांना प्रवचन व मार्गदर्शनपर उद्बोधन केले. श्रीकृष्णाच्या जीवनातील विचार, संस्कार, भक्ती, कर्मयोग व मानवतेचा संदेश यावेळी उपस्थित भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला.गोपाळकृष्ण मदिंराचे व्यावस्थापक वयोवृध्द मा नंदू काका रणभोर व रणभोर परिवार यांच्या माध्यमातून
जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त पर्जन्यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. समाधानकारक पाऊस पडून शेतकरी बांधवांच्या शेतीला बहर यावा, सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि परिसरात आनंदाचे वातावरण राहावे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या वेळी देवस्थान परिसरात ‘जय श्रीकृष्ण’, ‘गोविंदा गोपाळा’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन्माष्टमी उत्सवाचा आनंद घेतला.
या भक्तिमय व धार्मिक उत्सवाचे आयोजन रणभोर कुटुंबीय, खर्डा यांच्या वतीने करण्यात आले होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजक, ब्राह्मणवृंद, ग्रामस्थ व भाविकांनी सहकार्य केले.तर भावनिक तत्वनिष्ठ पध्दतीने सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते मा दिलिप रणभोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मा शामराव रणभोर यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
No comments:
Post a Comment