✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Wednesday, 26 August 2026

खर्डा मुस्लिम समाजाच्या वतीने1501 वी मोहम्मद पैगंबर जयंती ( ईद ऐ मिलाद) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

आज सकाळी खर्डा येथील मोमीन गल्लीतील चंदन मजिद पासून सकाळी दहा वाजता खर्डा शहरातील लहान थोर सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या जयंती मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी उपस्थित होते मुस्लिम धर्मातील विविध धार्मिक गिते साऊंड सिस्टीम मध्ये लावून व विविध धार्मिक घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने हातात हिरवे झेंडे व मुस्लिम धर्मातील विविध पेहेरावे करून अतिक्षय उत्साहात एकत्रित येऊन पुर्ण खर्डा शहरातून मिरवणूक काढण्यात आलीमिरवणूकीत मौलाना हाफिज नियाज अहमद रिझवी जामा मजिद इमाम हे ही कार्यक्रमात सहभागी झाले होते मिरवणुकीत सर्व धर्म समभाव या माध्यमातून हिंदू मुस्लिम धर्मातील नागरिकांनी एकमेकांना हस्तांदोलन देऊन मिठाई वाटत होते ही मिरवणूक गुलाबशहा मजिद जवळील शादी खाना येथील प्रांगणात हा सांगता समारंभात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ना शालेय साहित्य वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली खर्डा पोलिस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

No comments:

Post a Comment