✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Thursday, 13 August 2026

हभप रामायणचार्य डॉ संजय गिते यांना लोकनायक पुरस्कार प्रदान...

जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळील दिघोळ येथील रहिवासी रामायणाचार्य डॉ श्री संजय गीते यांना लोक यूवा वृत्तपत्र बुलढाणा महाराष्ट्र पत्रकार संस्थेद्वारे लोकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तसेच लोक यूवा वृत्तपत्रांच्या वर्धापन दिनानिमित्त संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 वितरण सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात हभप रामायणचार्य डॉक्टर श्री संजय गीते यांना साहित्य, संगीत,योग, अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026प्रधान करून सन्मानीत करण्यात आले ऐतिहासिक खर्डा नगरीत देखील शिक्षक , ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी, पत्रकार यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment