✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Monday, 10 August 2026

शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या ६७६ वी पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साही वातावरणात कार्यक्रमा ची सांगता खर्डा शहरातील शिंपी समाजाची एकजूट हा विशिष्ट अर्दश सर्व समाजाने घेणे उल्लेखणी आहे

कथाकार हभप जनार्दन महाराज माळवदे 
आज काल्याच्या किर्तनातून हभप माळवदे महाराज म्हणाले मी अनेक ठीकाणी किर्तन कार्यक्रम केले परंतु पहिल्या दिवशी पासून काल्याच्या किर्तना पर्यंत खर्डा येथील शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जो मी आठ दिवस पासून खर्डा शिंपी समाजाची अखंड एकजूट पाहून भारावून गेलो आहे 
 संत नामदेव महाराज यांच्या 
पुण्यतिथीनिमित्त नामदेव महाराज यांच्या संगीत चरित्र कथेच्या माध्यमातून हे वरील उदगार त्यांनी काढले
या संगीत चरित्र कथेला साधं दिली गायनचार्य हभप कपिल महाराज माळवदे,सिंथेसायजर व गायन हभप किशोर महाराज माळवदे, तब्बल वादक हभप अक्षय महाराज मोरे,हभप सचिन बुवा दुशी अतिशय सुंदर साथ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.रोज महीला शिंपी समाज यांनी दणदणीत आवाजात हरिपाठ म्हणून भाविकांची मने जिंकली तर संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पितळी मुखवटा सहीत पालखी सोहळा दिंडी पथका व संतांच्या नामस्मरणाने भक्तीमय भव्य दिव्य खर्डा शहरातून मिरवणूक काढली
शिंपी समाजाचे कार्यकर्ते मा.उमाकांत सातपुते व परिवार,मा.ज्ञानेश्वर मुळे, महेश मुळे परिवार,मा गणेशशेठ होमकर ( सिध्दनाथ कलेक्शन) मा अरविंद भागवत व प्रशांत भागवत यांनी अर्थीक सहकार्य व मिष्ठान्न महाप्रसाद आयोजन केले हाजारो भाविकांनी याचा लाभ घेतला 
शिंपी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा पंडित शेठ वडे सर्व खर्डा शिंपी समाज यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला .

No comments:

Post a Comment