श्री गणेश उत्सवानिमित्त सर्वत्र धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चालू असून वातावरण भक्तीमय झालेले आहे. ऐतिहासिक खर्डा शहरांमध्ये अनेक लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करून श्री गणेश उत्सव उस्फूर्तपणे साजरा करत आहेत. आज शनिवार दिनांक १९ रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन मधील गणेश उत्सवाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मिष्ठान्न भोजनाचा अनेकांनी लाभ घेतला. पोलिसांनी सुंदर व्यवस्था केली होती. उद्या सातव्या दिवशी या गणेशाचे विसर्जन केले जाते. तिथून पुढील चार दिवस खर्डा गावातील वेगवेगळ्या मंडळाचे गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश मूर्तीचे विसर्जन करताना निघणाऱ्या मिरवणुकीसाठी गणेश मंडळाकडून पारंपारिक वाद्य ,टाळ मृदुंगाचा घुमू द्या . नको आवाज दणदणाट डॉल्बी डीजेचा... अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे पारंपरिक वाद्ये वाजलीच पाहीजेत डीजे आणि डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे अनेक लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. आजारी व्यक्ती, हलक्या काळजाची व्यक्ती, दवाखाने, हॉस्पिटल, इत्यादी ठिकाणी मिरवणूक जात असताना याचा त्रास रुग्णांना व नागरिकांना होतो. त्यामुळे मिरवणुकीत डॉल्बी लावणे टाळावे. इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन वेगवेगळे प्रात्यक्षिके, लेझीम पथक, हलकी पथक, टाळ मृदंगाच्या ठेक्यात तर बँडच्या सुमधुर आवाजात गणेशाची मिरवणूक काढावी असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्य पोलिस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment