✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Sunday, 27 September 2026

गणेशोत्सव बंदोबस्त २०२६ - मन:पूर्वक आभार !

यंदाचा गणेशोत्सव व गणेश विसर्जन सोहळा खर्डा शहर व परिसरात शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या 

सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, पोलिस पाटील तसेच खर्डा परिसरातील गाव, वाड्या मधील सर्व सुजाण नागरिकांचे मी *खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो.*

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उत्सव कोणतीही अनुचित घटना न घडता यशस्वीरित्या पार पडला.

गणेश मंडळ कार्यकर्ते यांनी देखील या काळात पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचना प्रमाणे विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे .

गेल्या बारा दिवसांत खर्डा पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, शिस्तीत आणि सजग राहून चोख बंदोबस्त ठेवला. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडला.

*भविष्यातही असेच सहकार्य राहील आणि आपण सर्वजण एकत्रितपणे खर्डा परिसराची शांतता व सुव्यवस्था कायम राखू, हा विश्वास व्यक्त करतो.*

*धन्यवाद !*

*उज्वलसिंह राजपूत*
सहा पोलिस निरीक्षक, 
खर्डा पोलीस स्टेशन

No comments:

Post a Comment