मृत आई वडील, आजी आजोबा यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पितृ पक्ष घालतो. या पंधरावडा १५ दिवसात आपले आईवडील आणि आजीआजोबा ज्या तिथीला मृत पावले त्याच तारखेला आपण त्यांच्या बाबतीत आपले प्रेम,माया, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या माध्यमातून त्यांच्या प्रित्यर्थ आपण जवळच्या नातेवाईकांना या मित्र परिवार यांना निमंत्रित करून आलेले नातेवाईक हे आपले मातापिता या आजीआजोबा समजून त्यांच्या पाय धुऊन त्यावर गंध अक्षता वाहून पूजा करतात. तसेच त्यांचे मनोभावे दर्शन घेतात. या वेळी त्यांचा येथेच्छ सन्मान केला जातो.जेवणात कडी,वडा,आमटी,दूध,खिर, पुरण पोळी,भात,वरण, विविध भाज्या भेडी ,गवारशेंग,दोडका असे विविध पदार्थाने ताट सजवले जाते.भाताची पिंड तयार करुन यावर हळदकुंकू गुलाल बुक्का व फुले वाहून घराबाहेर कावळ्यास ते भाताचे पिंड ठेवले जाते. पिंडाला कावळा शिवला की पूर्वजा समाधी असल्याचे ग्राह्य धरण्यात येते. अशी हिंदू धर्मातील पुराण काळात पासून आलेली ही परंपरा आजही चालू आहे. ग्रामिण भागात अतिशय चांगल्या पद्धतीने जुन्या रूढी परंपरा जपली जात आहे. महागाई,कामाचे व्याप, दुष्काळजन्य परिस्थिती यांचा सुध्दा या परंपरेच्या पितृपक्ष कार्यक्रमावर परीणाम झाला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जण पन्नास साठ संबंधित नातेवाईकांना निमंत्रित करत असे परंतु आता चार पाच नातेवाईक निमंत्रीत करतात. म्हणजे महागाई, दुष्काळाच्या झळा हिंदू परंपरेला बसल्या आहेत. रक्ताचे नाते सुध्दा महागाई व दुष्काळ मुळे बाजूला सारून ठेवण्याची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत संस्कृती जपली जाते हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment