✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Monday, 28 September 2026

खर्डा नगरीत नवनिर्माण प्रभू श्रीराम मंदिर बांधकामाने घेतला वेग.नारीशक्ती व युवाशक्तीचा पुढाकार...

खर्डा ( प्रतिनिधी) खर्डा शहरामध्ये श्रीराम मंदिर बांधकामाचे काम अत्यंत उत्साहाने व जोमाने सुरू झाले असून ते मंदिर लवकरात लवकर पूर्वत्वाकडे नेण्यासाठी यांनी संयुक्तपणे विडा उचलला आहे.
 खर्डा परिसरातील महिला आणि तरुणांनी एकत्र येऊन कस्तुरीबाई मठ शिवपट्टण (खर्डा ) येथील मठातील आम्रनाथ बाबा उर्फ अमित महाराज यांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेतले त्यानंतर श्रीराम मंदिर बांधकाम वर्गणी जमा करण्याच्या कामाला खर्डा परिसरात मोठ्या जोमाने सुरुवात करण्यात आली आहे.
 या उपक्रमामुळे श्रीराम भक्त मध्ये एक नवीन संजीवनी निर्माण झाली आहे श्रीरामजी व नवनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे पवित्र कार्य अत्यंत उल्हासाच्या वातावरणात पार पडत आहे भक्तगणांनी दिलेल्या वर्गणीचा एक एक रुपया मंदिराच्या बांधकामासाठी सत्कारणी ला लावला जाणार आहे आपण दिलेला वर्गणीचा शब्द पूर्ण करावा ही ईश्वरा चरणी प्रार्थना असून हे श्रीराम मंदिर गावकऱ्याचे आहे.
 शिवपट्टण (खर्डा ) नारीशक्ती व युवाशक्ती या दोन्ही शक्ती एकत्र येऊन हे भव्य कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत खर्डा गावकऱ्यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरात लवकर साकार होणार आहे.
 तरी आपण सर्व वर्गणी दात्याचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व असेच सहकार्य आपले कायमस्वरूपी राहू द्या ही नम्र विनंती 
 जय श्रीराम जय नवनाथ जय आम्रनाथ बाबा ॥  जय गुरुदेव

No comments:

Post a Comment