✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏

Wednesday, 30 September 2026

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम खर्डा शहरामध्ये कौतुकास्पद पाऊल....

मा सचिनशेठ लोळगे यांचे सर्व थरातून अभिनंदन सामाजिक विकासाचा उचला विडा 
खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा येथे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, आजपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत.*शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. सचिन चंद्रकांत लोळगे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.* यामुळे शाळा परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार आहे.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी खर्डा पोलीस स्टेशनचे श्री. उज्वलसिंह राजपूत साहेब, सहाय्यक पोलीस अधिकारी, शशिकांत मस्के, संभाजी शेंडे, भगवान पालवे,बाबुराव जायभाय, राजू जाधव, उत्तम सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा. श्री. सचिन चंद्रकांत लोळगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच आपली सामूहिक जबाबदारी!
*"माझं गाव माझा अभिमान"*

No comments:

Post a Comment