महाराष्ट्रात शासनाने शेतकरी कुटुंबान मजबूत आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कुषी खात्याच्या माध्यमातून महीलांना सुध्दा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महीला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने काढून आपले महीला प्रमाणपत्राचे माध्यमातून खाली दोन्ही बॅनर्स दिलेले असून या महीला शेतकरी प्रमाणपत्र कसे ऑनलाईन करायचे ते सम्पूर्ण माहीती यात उपलब्ध आहे तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यातील कोणत्या लाभाचे काय फायदे यांची सुध्दा चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे याचा जास्त फायदा शेतकऱ्यांच्या पत्नी,मुलगी,सून , बहीणी यांच्या नावाने शेतकरी महीला प्रमाणपत्र च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा फायदा या लाभ घ्यावा
✨ लेखनी सम्राट न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे ✨ ताज्या घडामोडी, शैक्षणिक माहिती, स्थानिक व राष्ट्रीय बातम्या – सर्व काही एकाच ठिकाणी! आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या... धन्यवाद 🙏
Thursday, 1 October 2026
जामखेड तालुक्यातील शेतकरी महीला नी महीला शेतकरी प्रमाणपत्र त्वरित काढून घेण्याचे आवाहन ----
जामखेड तालुका कृषी अधिकारी मा रविंद्र घुले व एस पी पाचरणे मॅडम
Wednesday, 30 September 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम खर्डा शहरामध्ये कौतुकास्पद पाऊल....
मा सचिनशेठ लोळगे यांचे सर्व थरातून अभिनंदन सामाजिक विकासाचा उचला विडा
खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा येथे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, आजपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत.*शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री. सचिन चंद्रकांत लोळगे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.* यामुळे शाळा परिसरातील सुरक्षितता अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार आहे.या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी खर्डा पोलीस स्टेशनचे श्री. उज्वलसिंह राजपूत साहेब, सहाय्यक पोलीस अधिकारी, शशिकांत मस्के, संभाजी शेंडे, भगवान पालवे,बाबुराव जायभाय, राजू जाधव, उत्तम सोनवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा. श्री. सचिन चंद्रकांत लोळगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच आपली सामूहिक जबाबदारी!
*"माझं गाव माझा अभिमान"*
Monday, 28 September 2026
खर्डा नगरीत नवनिर्माण प्रभू श्रीराम मंदिर बांधकामाने घेतला वेग.नारीशक्ती व युवाशक्तीचा पुढाकार...
खर्डा ( प्रतिनिधी) खर्डा शहरामध्ये श्रीराम मंदिर बांधकामाचे काम अत्यंत उत्साहाने व जोमाने सुरू झाले असून ते मंदिर लवकरात लवकर पूर्वत्वाकडे नेण्यासाठी यांनी संयुक्तपणे विडा उचलला आहे.
खर्डा परिसरातील महिला आणि तरुणांनी एकत्र येऊन कस्तुरीबाई मठ शिवपट्टण (खर्डा ) येथील मठातील आम्रनाथ बाबा उर्फ अमित महाराज यांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेतले त्यानंतर श्रीराम मंदिर बांधकाम वर्गणी जमा करण्याच्या कामाला खर्डा परिसरात मोठ्या जोमाने सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे श्रीराम भक्त मध्ये एक नवीन संजीवनी निर्माण झाली आहे श्रीरामजी व नवनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे पवित्र कार्य अत्यंत उल्हासाच्या वातावरणात पार पडत आहे भक्तगणांनी दिलेल्या वर्गणीचा एक एक रुपया मंदिराच्या बांधकामासाठी सत्कारणी ला लावला जाणार आहे आपण दिलेला वर्गणीचा शब्द पूर्ण करावा ही ईश्वरा चरणी प्रार्थना असून हे श्रीराम मंदिर गावकऱ्याचे आहे.
शिवपट्टण (खर्डा ) नारीशक्ती व युवाशक्ती या दोन्ही शक्ती एकत्र येऊन हे भव्य कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत खर्डा गावकऱ्यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न लवकरात लवकर साकार होणार आहे.
तरी आपण सर्व वर्गणी दात्याचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व असेच सहकार्य आपले कायमस्वरूपी राहू द्या ही नम्र विनंती
जय श्रीराम जय नवनाथ जय आम्रनाथ बाबा ॥ जय गुरुदेव
Sunday, 27 September 2026
पितृ पक्ष कृतज्ञता व्यक्त करणारा पंधरवडा...
खर्डा दिनांक २७
मृत आई वडील, आजी आजोबा यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पितृ पक्ष घालतो. या पंधरावडा १५ दिवसात आपले आईवडील आणि आजीआजोबा ज्या तिथीला मृत पावले त्याच तारखेला आपण त्यांच्या बाबतीत आपले प्रेम,माया, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या माध्यमातून त्यांच्या प्रित्यर्थ आपण जवळच्या नातेवाईकांना या मित्र परिवार यांना निमंत्रित करून आलेले नातेवाईक हे आपले मातापिता या आजीआजोबा समजून त्यांच्या पाय धुऊन त्यावर गंध अक्षता वाहून पूजा करतात. तसेच त्यांचे मनोभावे दर्शन घेतात. या वेळी त्यांचा येथेच्छ सन्मान केला जातो.जेवणात कडी,वडा,आमटी,दूध,खिर, पुरण पोळी,भात,वरण, विविध भाज्या भेडी ,गवारशेंग,दोडका असे विविध पदार्थाने ताट सजवले जाते.भाताची पिंड तयार करुन यावर हळदकुंकू गुलाल बुक्का व फुले वाहून घराबाहेर कावळ्यास ते भाताचे पिंड ठेवले जाते. पिंडाला कावळा शिवला की पूर्वजा समाधी असल्याचे ग्राह्य धरण्यात येते. अशी हिंदू धर्मातील पुराण काळात पासून आलेली ही परंपरा आजही चालू आहे. ग्रामिण भागात अतिशय चांगल्या पद्धतीने जुन्या रूढी परंपरा जपली जात आहे. महागाई,कामाचे व्याप, दुष्काळजन्य परिस्थिती यांचा सुध्दा या परंपरेच्या पितृपक्ष कार्यक्रमावर परीणाम झाला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जण पन्नास साठ संबंधित नातेवाईकांना निमंत्रित करत असे परंतु आता चार पाच नातेवाईक निमंत्रीत करतात. म्हणजे महागाई, दुष्काळाच्या झळा हिंदू परंपरेला बसल्या आहेत. रक्ताचे नाते सुध्दा महागाई व दुष्काळ मुळे बाजूला सारून ठेवण्याची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत संस्कृती जपली जाते हे मात्र नक्की.
गणेशोत्सव बंदोबस्त २०२६ - मन:पूर्वक आभार !
यंदाचा गणेशोत्सव व गणेश विसर्जन सोहळा खर्डा शहर व परिसरात शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या
सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, पोलिस पाटील तसेच खर्डा परिसरातील गाव, वाड्या मधील सर्व सुजाण नागरिकांचे मी *खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो.*
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उत्सव कोणतीही अनुचित घटना न घडता यशस्वीरित्या पार पडला.
गणेश मंडळ कार्यकर्ते यांनी देखील या काळात पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचना प्रमाणे विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे .
गेल्या बारा दिवसांत खर्डा पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक, शिस्तीत आणि सजग राहून चोख बंदोबस्त ठेवला. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे विसर्जन सोहळा सुरळीत पार पडला.
*भविष्यातही असेच सहकार्य राहील आणि आपण सर्वजण एकत्रितपणे खर्डा परिसराची शांतता व सुव्यवस्था कायम राखू, हा विश्वास व्यक्त करतो.*
*धन्यवाद !*
*उज्वलसिंह राजपूत*
सहा पोलिस निरीक्षक,
खर्डा पोलीस स्टेशन
Saturday, 19 September 2026
घूम उद्या आवाज टाळ मृदुंगाचा नको दणदणात डीजे डॉल्बीचा अहिल्यानगर पोलीस दल व खर्डा पोलीस स्टेशन कडून गणेश भक्तांना आवाहन..
खर्डा दिनांक १९
श्री गणेश उत्सवानिमित्त सर्वत्र धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चालू असून वातावरण भक्तीमय झालेले आहे. ऐतिहासिक खर्डा शहरांमध्ये अनेक लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना करून श्री गणेश उत्सव उस्फूर्तपणे साजरा करत आहेत. आज शनिवार दिनांक १९ रोजी खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशन मधील गणेश उत्सवाचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मिष्ठान्न भोजनाचा अनेकांनी लाभ घेतला. पोलिसांनी सुंदर व्यवस्था केली होती. उद्या सातव्या दिवशी या गणेशाचे विसर्जन केले जाते. तिथून पुढील चार दिवस खर्डा गावातील वेगवेगळ्या मंडळाचे गणपतीचे विसर्जन केले जाते. गणेश मूर्तीचे विसर्जन करताना निघणाऱ्या मिरवणुकीसाठी गणेश मंडळाकडून पारंपारिक वाद्य ,टाळ मृदुंगाचा घुमू द्या . नको आवाज दणदणाट डॉल्बी डीजेचा... अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे पारंपरिक वाद्ये वाजलीच पाहीजेत डीजे आणि डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे अनेक लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. आजारी व्यक्ती, हलक्या काळजाची व्यक्ती, दवाखाने, हॉस्पिटल, इत्यादी ठिकाणी मिरवणूक जात असताना याचा त्रास रुग्णांना व नागरिकांना होतो. त्यामुळे मिरवणुकीत डॉल्बी लावणे टाळावे. इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन वेगवेगळे प्रात्यक्षिके, लेझीम पथक, हलकी पथक, टाळ मृदंगाच्या ठेक्यात तर बँडच्या सुमधुर आवाजात गणेशाची मिरवणूक काढावी असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्य पोलिस उपनिरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी केले आहे.
Thursday, 17 September 2026
कै नितिन बापू गोलेकर यांचे विचार आचरणात आणणे हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली -श्रीमती जयश्रीताई गोलेकर....
आज कै नितिन बापू गोलेकर यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कै नितिन गोलेकर वि वि का सेवा संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे जामखेड येथील नागेश विद्यालयाचे प्राचार्य मा बि.के.मडके सर होते तसेच खर्डा इंग्लीश स्कूल खर्डा या विद्यालयाचे प्राचार्य गदादे सर, नागेश विद्यालयाचे प्राचार्य मा कैलास वायकर, प्राचार्य मा एस.पी.जाधव सर व कै नितिन गोलेकर यांच्या धर्म पत्नी श्रीमती जयश्रीताई गोलेकर.,
जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा रमेश पाटील सर मा मुकुंदराव गोलेकर
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना अश्रू अनावर झाले असताना श्रीमती जयश्रीताई गोलेकर म्हणाल्या त्यांचे सामाजिक, शैक्षणिक,व सहकारातील विचार आचरणात आणणे म्हणजे च त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल
प्रमुख पाहुणे प्राचार्य बि के मडके यांनी देखील त्यांच्या समवेत राहील्याने त्यांचे अष्टूपैलू गुंणाबद्दल विशेष कौतुक केले व हे गुण अंगी कारणे म्हणजे सुखी जिवनाची वाटचाल होईल असे ही बोले
या वेळी अनेक कै बापूंच्या प्रेमी सहकार्यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, श्रीकांत लोखंडे, , दिलिप रणभोर यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले तर रमेश पाटील सर यांचे मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले व त्याच भावनेने श्रोत्यांना सुध्दा डोळ्यात अश्रू आले
या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले मोहन लोखंडे, चेअरमन मा सुहास गोलेकर, चेअरमन चंद्रकांत गोलेकर, नंदूशेठ लद्दड,मिलनशेठ कांकरिया, प्रविणशेठ कोरे,विकास शेठ दिंडोरे ,भागवत आंधळकर, धनंजय येवले, सुरेश शिंदे, तुकाराम शिंदे, संजय देशमुख,बन्सी ढेरे,राजू जिंकरे, गौतम गोपाळ घरे,दत्ता काळे, सिताराम जावळे, परमेश्वर गोलेकर,पिंटू जगताप,राजू साळूंके,तांदळे भाऊसाहेब,भूते गुरूजी, बाळासाहेब काळे,तर राजेंद्र वेणूनाथ गोलेकर हे भावनिक झाले होते कार्यक्रमांच्या अनुषंगाने खर्डा इंग्लीश स्कूल खर्डा या विद्यालयाचे विद्यार्थी उच्चस्तरीय पदावर कार्यरत आहेत ते हजर राहू शकले नाही म्हणून त्यांच्या पालकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले हा सन्मान भागवत आंधळकर व धनंजय येवले यांचा सन्मान झाला मोन्या काळे व राम शिंदे व विठ्ठल लोखंडे यांनी उपस्थितांना अल्पोहाराचे वाटप करून चोख व्यवस्था ठेवली श्रीकांत लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली
Subscribe to:
Posts (Atom)